
सामना प्रतिनिधी । गेवराई
हजारो खातेदारांना करोडो रुपयांचा गंडा घातलेल्या शुभ कल्याण मल्टीस्टेटचा चेअरमन दिलीप आपेट याला पोलिसांनी अटक केली परंतु शाखेचे पंचनामे झाले नव्हते. शनीवारी सकाळी ११ वाजता बीड पोलिसांनी स्पॉट पंचनामा करत दस्तऐवजांची झडाझडती घेतली.
सदरील पोलिसांनी पंचनाम्यात शाखेतील तिजोरीला, सील केले असून शाखेतील संगणक, लायसन्स, महत्वाचा दस्तावेज ताब्यात घेतला आहे. संगणकाची हार्ड डीस्कही ताब्यात घेतली असून कोणत्या खातेदारास किती कर्ज वाटले. किती खातेदारांच्या ठेवी आहेत, याची माहिती प्राप्त करण्यासाठी मुंबई येथील मुख्यालयात हार्ड डीस्क तपासणीसाठी पाठवली आहे. ही कारवाई पी एस आय खटके, पठान, गाडगे आदी कर्मचाऱ्यांनी केली.





























































