
सामना प्रतिनिधी । मुंबई
माटुंगा शालिनी भालेकर 23 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत हेमंत वायंगणकर संघाने विजेतेपद पटकावले. अखेरच्या फेरीतल्या सामन्यात जहांगीर पीठावाला संघाच्या 419 धावांना उत्तर देताना वायंगणकर संघाने 5-314 असे उत्तर दिले. आशय सरदेसाईने त्यात नाबाद 128 धावांची खेळी केली. ही लढत अनिर्णीत राहिली.
दुसऱया सामन्यात दिलीप वेंगसरकर संघाने चंद्रशेखर संत संघाविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळविला. त्यात वेंगसरकर संघाच्या कौशिक चिखलकरने नाबाद 103 धावांची खेळी केली. पहिल्या डावात शतक ठोकणाऱया आकाश आनंदचे दुसऱया डावातील शतक मात्र दोन धावांनी हुकले.स्कोअरबोर्ड जहांगीर पीठावाला 419 (भूपेन लालवाणी 191, जय बिस्ता 94, हार्दिक तामोरे 58, अभिमन्यू वशिष्ठ 5-97, ध्रूमिल मटकर 4-98) अनिर्णीत वि. हेमंत वायंगणकर संघ 5-314 (आशय सरदेसाई ना. 128, अभिषेक श्रीवास्तव 60, सृजन आठवले 42, आतिफ शेख 3-93).दिलीप वेंगसरकर संघ 304 आणि 5-299 (कौशिक चिखलीकर ना. 103, आकाश आनंद 98, निखिल पाटील 59, सलमान खान 3-124) अनिर्णीत वि. चंद्रशेखर संत 191 (जय दवणे 63, वैभव पाटील 36, शुभम् पांडे 5-28).



























































