कल्याणच्या विहिरीत इलेक्ट्रीक करंट? तिघांसह 2 जवानही बुडाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कल्याण

कल्याणमध्ये एका विहिरीत अग्निशमन दलाच्या दोन जवानांसह इतर तीन जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्याणच्या चक्की नाका परिसरातील एका विहिरीमध्ये पोहायला गेलेले दोन मुलं आणि एक सफाई कामगार असे तीनजण बुडाल्याची माहिती मिळताच बचावकार्यासाठी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. मात्र बचावकार्यासाठी गेलेले अग्निशमन दलाचे दोन जवानही बुडाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या अग्निशमन दलच्या जवानांकडून विहिरीत शोधकार्य सुरू आहे.

दरम्यान, या विहिरीत इलेक्ट्रीक करंट उतरल्याची चर्चा सुरू आहे. मात्र या माहितीला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात