
सामना प्रतिनिधी । नांदेड
एकीकडे शहरात लक्ष्मीपूजनाची धामधूम सुरू असताना दुसरीकडे देगलूर नाका परिसरात जन्ना मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकाला मिळाली. या पथकाने कारवाई करत 22 आरोपींना अटक केली. यावेळी 75 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
पोलीस अधिक्षक संजय जाधव, अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉक्टर अक्षय शिंदे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी रात्री बिलाल नगर भागात ही कारवाई करण्यात आली. एपीआय दिघोरे यांनी आपले सहकारी राजू पांगरीकर, बालाजी सातपुते, तानाजी येळगे, घुंगरूसिंग टाक, जसवंतसिंग यांना घेऊन या जुगार अड्ड्यावर कारवाई केली.
अटक करण्यात आलेल्या शेख अहमद शेख नानासाहेब मोहम्मद इब्राहिम, महमद हिशोब इब्राहिम खान मनुजा खान, सतीश कुंडलिक सालगडी, अब्दुल रफिक अब्दुल रजाक, मुजमील अहमद अब्दुल नईम विजय अशोक तुरे, शेख फिरोज शेख बाबुमिया, दाऊद पठाण इब्राहिम पठाण, मामा उस्मान रियाज अहमद अब्दुल, विरेंद्र सिंग राजेंद्र सिंह परीहार, कंठीराम संभाजी सवारी, शुभम संजय सिंग ठाकूर, शिवाजी हाऊसेकर, अब्दुल वहाब अब्दुल हलीम, सय्यद रफिक सय्यद अन्वर, राजेंद्रसिंह किशन सिंह गहलोत, विक्रम विजय सिंह ठाकूर, वसीम खान अब्बास खान, सतीश सत्येंद्र परदेशी आणि महंमद अहमद छोटे मिया यांना अटक केली त्यांच्याविरुद्ध एपीआय विनोद दिघोरे यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































