
सामना ऑनलाईन, नगर
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. युवक काँग्रसेचे जिल्हाध्यक्ष गौरव ढोणे यांनी त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसह उपनेते अनिल राठोड यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी नगर संपर्क प्रमुख भाऊ कोरगांवकर, नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रा.शशिकांत गाडे, समन्वयक घनश्याम शेलार, युवा सेनेने जिल्हाधिकारी विक्रम राठोड, नगरसेवक सुरेश तिवारी, अशोक दहिपळे, गिरीष जाधव, यांच्यासह अनेक उपदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बोलताना शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी “शिवसेनेची नगर शहरात ताकद मोठ्या प्रमाणात आहे. सर्वसामान्य जनतेबरेाबर शिवसेना सातत्याने राहिली आहे. युवक वर्गही मोठ्या प्रमाणावर आकर्षित झाला आहे. शिवसेनेने कधी घरणोशाहीचे राजकारण केलेले नाही. राठोड घराण्यातील कोणी महापौर केला नाही, तर सर्वसामान्य शिवसैनिकांना पदे दिली हा शिवसेनेचा येथील इतिहास आहे, ढोणे यांची सुध्दा प्रभागात मोठी ताकद आहे. या मनपात यंदा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
संपर्क नेते भाऊ कोरगांवकर यांनी म्हटलं की शिवसनेची नगर शहरातील ताकद ही वाढतच चालली आहे. महानगरपालिकेची निवडणूक ही शिवसेना मोठ्या ताकदीने लढणार असून महापालिकेवर भगवा फडकवणारच असा विश्वासही कोरगांवकर यांनी व्यक्त केला.


























































