महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना निवडणूक; मुंबईची मदार गजानन कीर्तीकरांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीत बहुतांशी पदासाठी उमेदवार बिनविरोध निवडून येणार हे निश्चित झाले आहे. येत्या 25 नोव्हेंबरला होणाऱया निवडणूकीत कार्याध्यक्ष व कोषाध्यक्ष या दोनच पदांसाठी रस्सीखेच बघायला मिळणार आहे. मुंबई उपनगरचे गजानन कीर्तीकर व संभाजीनगरचे दत्ता पाथ्रीकर यांच्यामध्ये कार्याध्यक्ष पदासाठी तर कोल्हापूरचे रमेश भेंडगिरी व परभणीचे मंगल पांडे यांच्यामध्ये कोषाध्यक्ष पदासाठी चुरस रंगेल. उमेदवारांच्या यादीत आता फक्त गजानन कीर्तीकर यांच्या रुपात एकच नाव मुंबईकडून पुढे आले आहे. त्यामुळे त्यांच्यावरच आता मुंबईची मदार असणार आहे.