राम मंदिराची जागा काँग्रेसने अधिग्रहीत करुन ठेवली, दानवेंचे वादग्रस्त विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
raosaheb-danve

सामना प्रतिनिधी । हिंगोली

‘अयोध्येतील राम मंदिराची जागा काँग्रेसने अधिग्रहित करुण ठेवली आहे’, असे वादग्रस्त विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी आज हिंगोलीत पत्रकार परिषदेत बोलताना केले.

हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीपूर्वी रावसाहेब दानवे यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने राम मंदिर अडथळे आणले आहेत असे विधान केले असून अडथळे म्हणजे नेमके काय असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राम मंदिराची जागा काँग्रेसने अधिग्रहीत करून ठेवली आहे, असे वादग्रस्त विधान केले. अडथळा म्हणजे नेमके काय या प्रश्नावर त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. पुन्हा प्रश्न केल्यावर सगळ्याच प्रश्नावर उत्तरे नसतात असे म्हणत दानवे हे निरुत्तर झाले.