अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर ‘फोर मोर शॉट्स प्लीज’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या प्राइम सदस्यांसाठी 25 जानेवारीपासून ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ ही नवीन मालिका सुरू होत आहे. शहरी भागात राहणाऱया चार तरुण महिलांच्या राहणीमानावर शोमधून प्रकाश टाकला जाईल. महिलांचे नाते, कामातील संघर्ष, आकांक्षा आणि चिंता यांच्याभोवती हा शो फिरतो. रंगिता प्रितीश नंदी निर्मित, प्रितीश नंदी कम्युनिकेशन्सची निर्मिती आणि अनू मेनन यांचे दिग्दर्शन असलेला हा शो महिला प्रेक्षकांना डोळय़ांसमोर ठेवून साकारण्यात आला आहे. 200 देशांतील प्राईम सदस्यांना ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ आनंद घेता येईल. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओचे संचालक व कन्टेंट प्रमुख विजय सुब्रमण्यम म्हणाले, हिंदुस्थानातील चार शहरी महिला, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे गुण, संघर्ष, प्रणय अशी महिला केंद्री कथा सादर करताना आनंद होत आहे. शोमधील व्यक्तिरेखा विचारांनी स्वतंत्र असलेल्या महिलांचे प्रतिनिधित्व करतात.