प्रयागराज नाव दुर्घटनेत परभणीच्या चार जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

अस्थि विसर्जनासाठी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे गेलेल्या परभणी जिल्ह्यातील दैठणा आणि माखणी येथील चार जणांचा मृत्यू झाला असून पाचजण बेपत्ता झाले आहेत. ही दुर्दैवी घटना सोमवारी संध्याकाळी घडली आहे. दरम्यान बेपत्ता व्यक्तींचा शोध चालू असल्याची माहिती प्रयागराज येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कोलंबी येथील बैस कुटुंबीय उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे माजी पंचायत समिती सदस्य रमेश बैस यांच्या आईच्या अस्थि विसर्जनासाठी एकूण १४ जण गेले होते. प्रयागराज येथील किडगंज येथील सरस्वती घाटावर सोमवारी सायंकाळी नाव उलटून दुघर्टना घडली. यात परभणी तालुक्यातील दैठणा येथील महिला राधाबाई केशवराव कच्छवे, भागाबाई बळीराम कच्छवे, लक्ष्मीबाई केशवराव कच्छवे आणि माखणी येथील बाबुराव रामचंद्र शिसोदे यांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत. तर केशव कच्छवे हे बेपत्ता इसम सापडले आहेत.

दरम्यान या दुर्घटनेतील दिगंबर रामराव बैस (७२), बालाजी दिगंबर (५०), रमाकांत दिगांबर (४०), देवीदास नारायण कच्छवे (५५) हे चौघेजण बेपत्ता आहेत. तसेच या घटनेत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील भोजराज घनश्याम (७०) हे देखील बेपत्ता आहेत. या नावेमध्ये एकूण १४ व्यक्ती होत्या. मनोहर माणिकराव (३२) आणि चंद्रपूर येथील मीनाक्षी रोशन पटवार (३८) यांना सुरक्षीत बाहेर काढण्यो यश आले आहे. पाण्यातून बाहेर काढलेल्या कोलंबी येथील सुनीता देवीदास कच्छवे (५०), ज्योती बालाजी (४५), अहमदपूर येथील अंगद नारायण कच्छवे (४७)आणि केशव कच्छवे यांच्यावर एस.आर.एन. या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती हाती आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील कोलंबी येथील मयत व्यक्तीचे नावे पुढील प्रमाणे. रमेश दिगांबर बैस, बालाजी दिगांबर बैस, दिगंबर रामराव बैस तसेच भारती बालाजी बैस आणि मनोहर बैस हे बेपत्ता इसम सापडले आहेत.