कांगारूंना द्राक्ष आंबट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, अॅडलेड

ऑस्ट्रेलियाला नेहमी ‘बॅड लूझर्स’ म्हणून ओळखले जाते. काही वर्षांपूर्वी क्रिकेटवर अधिराज्य करणाऱ्य़ा या संघाला पराभव झालेला पचनी पडत नाही. मायदेशात झालेला पराभव तर त्यांच्या जिव्हारीच लागतो. हिंदुस्थानने अॅडलेड कसोटी जिंकून त्यांच्या शेपटावर पाय दिलाय. यामुळे आता त्यांनी या पराभवाची कारणे शोधायला सुरुवात केलीय. ऑस्ट्रेलियातील फॉक्स या क्रीडा वाहिनीने के एल राहुल याने जोश हेझलवूडच्या टिपलेल्या झेलवर संशय व्यक्त केला आहे. या वाहिनीकडून रवी अश्विनने घेतलेल्या हेझलवूडच्या अखेरच्या विकेटचा व्हीडीओ सोशल साईटवर प्रसिद्ध करण्यात आला. यानंतर भारतीय चाहत्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले. पाकिस्तान व बांगलादेश या देशांप्रमाणे तुम्हीही आता पराभवाची कारणे शोधायला लागला आहात, अशा भाषेत चाहत्यांनी त्यांना सुनावले आहे.