मनमोहन सिंग ‘मौनी’ होते का? आकडे काही वेगळंच सांगताहेत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-manmohan-singh

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ‘मौनी’ पंतप्रधान म्हणून काही विशिष्ट गटांकडून सोशल मीडियावर हिणवले जाते. मात्र काँग्रेसने हे आरोप खोडून काढले आहेत. तसेच काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला बोल करतानाच मनमोहन सिंग यांची पाठराखण केली आहे. मनमोहन हे पत्रकारांच्या प्रश्नांना घाबरणारे पंतप्रधान नव्हते. ते अनेकदा मीडियाला सामोर जायचे आणि परदेश दौऱ्यावेळी देखील ते पत्रकार परिषद घ्यायचे, असा दावा या नेत्याने केला आहे.

हिंदी न्यूज पोर्टल जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, आकड्यांवर नजर टाकल्यास मनमोहन यांनी आपल्या कार्यकाळात दोन पत्रकार परिषदा आणि दोन वेळा एडिटर्स कॉन्फरेन्स घेतल्या होत्या. तर विदेश दौऱ्यावेळी एकूण आठ पत्रकार परिषदा त्यांनी घेतल्या होत्या. तसेच अन्य काही कार्यक्रमांमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना ते सामोरे गेल्याचे तीन वेळा पाहायला मिळते.

मात्र असे असले तरी देखील त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे जनतेशी ‘मन की बात’, केलेली नाही. मोदींनी 50 वेळा ‘मन की बात’मधून रेडिओ आणि दूरदर्शनच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधला आहे. पण मोदी थेट पत्रकार परिषदांना सामोरे गेलेले नाहीत. पंतप्रधानांच्या शपथविधीआधी, संसदेच्या अधिवेशेनाची माहिती देताना, तसेच दिवाळी संमेलनात पत्रकार परिषद बोलवली गेली मात्र याप्रसंगी मोदींनी केवळ माहिती देऊन पत्रकार परिषद संपवली.