
सामना प्रतिनिधी । नगर
राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा पारा हा वाढत गेला आहे. त्यामुळे सर्वत्र थंडीची लाट आली आहे. नगर शहरात तापमान हे 6.3 अंशावर गेल्यामुळे कडाक्याची थंडी पडली आहे.
राज्यामध्ये गेल्या आठ दिवसात वातावरणात बदल मोठ्या प्रमाणावर झाला आहे. थंडीची लाट ही सर्वत्र आता पहायला मिळत आहे. नगर शहरामध्येसुध्दा गेल्या चार दिवसापासून मोठ्या प्रमाणावर थंडी पहायला मिळत आहे. आज नगर शहराचे तापमान हे 6.3 अंशावर गेले आहे. राज्यामध्ये नागपुर, नाशिक, पुणे, महाबळेश्वर, जळगांव याच्या पाठोपाठ आता हे तापमान अत्यंत कमी झाले आहे. थंडी बरोबरच बोचर्या वार्यामुळे नगरकर चांगलेच हैराण झाले आहेत.
उत्तरेकडून येणार्या शितवार्याचा जोर वाढल्यामुळे नगरमध्ये थंडीची हुडहुडी वाढत चालली आहे. किमान तापमान घसरल्याने आता सर्वत्र शेकोट्या पेटवल्या जात आहे. त्यामुळे बाजारपेठेतसुध्दा आता मोठ्या प्रमाणात शुकशुकाट पहाला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे शाळेच्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. सकाळी शाळा असल्याने विद्यार्थी थंडीत काकडत शाळेत पोहचत आहे. मात्र, आता थंडीची लाट असल्याने शाळेच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.





























































