
सामना ऑनलाईन, मुंबई
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये होत असलेल्या पडझडीचा परिणाम मुंबईतील शेअरबाजारावरही झाला आहे. सेन्सेक्सने आज ३७० अंकांची गटांगळी खाल्ली असून सकाळी अकरा वाजेच्या सुमारास तो ३६०७१ अंकावर होता.
गुरुवारी सेन्सेक्स ३६४३२ अकांवर होता. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी सेन्सेक्स किरकोळ प्रमाणात वधारला होता. मात्र शुक्रवारी सेन्सेक्सने मजबूत आपटी खाल्ल्याचं चित्र बघायला मिळतंय.



























































