बीड शहरात पाणी संकट: पाईप फुटून पाणी मात्र जातेय वाया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

बीड शहराला पाणी पुरवठा करणारे माजलगाव धरण शेवटच्या घटका मोजत आहे, धरणातील पाणी जोत्याच्या खाली गेले आहे, शहरावर पाणी संकटाची तलवार कायम असताना बीड शहराकडे येणाऱ्या पाणी पुरवठाच्या पाईप लाईन ला मोठे भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे.

बीड शहराला 25 कि मी दुरून माजलगावच्या धरणातील बँक वॉटरमधून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळामुळे पाणी बाणी निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील तलावात अवघे दोन टक्के पाणी साठा शिल्लक आहे. जवळपास लघु आणि मध्यम धरणे कोरडी ठाक पडत आहेत तर मोठ्या प्रकल्पात जेमतेम पाणी साठा शिल्लक आहे. माजलगावचे धरणही शेवटच्या घटका मोजत आहे. बीड शहराला भविष्यात पाणी संकटाचा सामना करावा लागणार असतांना माजलगावच्या धरणातून बीडकडे येणारी पाणी पुरवठ्याची पाईप लाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.