
सामना ऑनलाईन । उल्हासनगर
वडोल गावातील नाल्यासमोरून जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ… इतक्यात नाल्यातील एका पिशवीतून लहानग्याच्या रडण्याचा आवाज ऐपू येतो आणि सुरू होतो, अवघ्या एक तासाच्या अर्भकाला वाचवण्याचा संघर्ष…एकीकडे शरीर गोठवून टाकणाऱ्या थंडीने सर्वसामान्य गारठले असताना बाळाला पिशवीत बांधून निर्दयी माता-पित्याने सांडपाण्यानी भरलेल्या नाल्यात फेकून दिले होते. त्याच्या रडण्याच्या आवाजाने रक्ताच्या नसलेल्या परक्यांनीही आपलेसे करून जीवदान दिले.
माता-पित्यावर गुन्हा
पोटच्या बाळाला नाल्यात फेकून पळून गेलेल्या अज्ञात माता-पित्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती शिवाजी रगडे यांनी दिली. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून या अर्भकाच्या आई – वडिलांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. सध्या अर्भकाची प्रपृती स्थिर असून बालरोग शल्य चिकित्सकांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.



























































