
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्यातील दहावीच्या 11 लाख 57 हजार 332 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कल आणि अभिक्षमता चाचणी दिली आहे. 18 डिसेंबरपासून शाळांमध्ये ही चाचणी घ्यायला सुरूवात झाली. यंदा प्रथमच मोबाईलद्वारे ही चाचणी घेण्यात येत आहे. साधारण 3 लाख 70 हजारांपेक्षा जास्त मोबाईल फोन या चाचणीसाठी वापरले आहेत. कलचाचणी देणारे सर्वाधिक विद्यार्थी हे भंडारा जिह्यातील असून कलचाचणी देणार्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबईची (डीवायडी) टक्केवारी सर्वात कमी आहे.
23 जानेवारीपर्यंत शाळांमध्ये कल आणि अभिक्षमता चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीसाठी आतापर्यंत राज्यातील 20 हजार 251 शाळांनी नोंदणी केली आहे. यंदा प्रथमच कलचाचणीसोबतच विद्यार्थ्यांची ‘अभिक्षमता चाचणी’ देखील घेण्यात येत आहे. ज्यामुळे किद्यार्थ्यांना आकडीचे क्षेत्र, त्यासाठी आकश्यक क्षमता या मानसशास्त्राrय चाचण्यांद्वारे जाणून घेता येईल. तसेच त्या क्षेत्रात उपलब्ध असणार्या संधींचा शोध ‘महाकरिअरमित्र पोर्टल क अँप’द्वार घेता येईल. गेल्यावर्षी 2017 -18 या शैक्षणिक कर्षामध्य दहावीच्या 17 लाख 36 हजार 104 विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली होती.
- मोबाईलद्वारे कलचाचणी देण्याचे प्रमाण69
- भंडारा जिह्यात कलचाचणीचे प्रमाण सर्वाधिक28 टक्के
- मुंबई (डीवायडी) विभागात सर्वात कमी22 टक्के
विभागनिहाय कलचाचणी देणारे विद्यार्थी
पुणे 1,92,662
नागपूर 1,20,544
संभाजीनगर 1,42,052
मुंबई 1,80,701
कोल्हापूर 1,22,059
अमरावती 1,29,687
नाशिक 1,59,457
लातूर 84,536
कोकण 25,634




























































