चहा पिणारे जास्त सतर्क आणि एकाग्र, संशोधकांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीजिंग

हिंदुस्थान म्हणजे सर्वाधिक चहा पिणाऱ्यांचा देश. सकाळ, दुपार, संध्याकाळ वेळ कोणतीही असो, चहाला नाही म्हटलं जात नाही. चहा पिणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. चहा प्यायल्याने सतर्वâता आणि एकाग्रता वाढते. अनेक गोष्टींबद्दलचे विचार अधिक स्पष्ट होतात, असा दावा संशोधकांनी केला आहे.

चीनची राजधानी बीजिंगमधील पेकिंग विद्यापीठाने चहासंदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. चहा विचारशक्तीवर कसा परिणाम करते, याबाबतचे हे संशोधन आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार चहामधील कॅफीन आणि थेनीन या घटकांमुळे व्यक्ती सतर्वâ आणि सजग राहते. चहामधील कॅफीन आणि थेनीनचा मेंदूमधील क्रिएटिव्ह विचारशक्तीशी कसा संबंध आहे, याबद्दलही संशोधनातून माहिती देण्यात आली आहे. संशोधनासाठी मानसोपचार तज्ज्ञांनी दोन वेगवेगळ्या गटांमध्ये ५० विद्याथ्र्यांच्या मदतीने काही प्रयोग केला. सरासरी २३ वर्ष वयोगट असणाऱ्या एका गटातील मुलांना पाणी तर दुसऱ्या गटातील मुलांना कोरा चहा प्यायला दिला. त्यानंतर या विद्याथ्र्यांना काही क्रिएटिव्ह कामे सांगण्यात आली. चहा पिणाऱ्या विद्याथ्र्यांचे विचार हे अधिक क्रिएटिव्ह असतात, असा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे.

– चहा प्यायलानंतर लगेचच व्यक्तीच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना जन्म घेतात असंही या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
– एखादी व्यक्ती दिवसभरामध्ये किती वेळा चहा पिते यावर तिचे विचार किती क्रिएटिव्ह आहेत हे ठरतं.
– चहा हा विचारशक्तीसाठी चांगला असला तरी अतिसेवन धोकादायक असल्याचा इशारा अभ्यासकांनी दिला आहे. गरज असेल तेव्हाच चहा प्यायला हवा असा निष्कर्ष संशोधकांनी काढलाय.