
सामना प्रतिनिधी । मुंबई
पावसाच्या पाण्याचा जलद निचरा होण्यासाठी पालिकेने पंपिंग स्टेशनमध्ये ‘बॅक रेक स्क्रीन’ बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर वाहून येणारा कचरा या ठिकाणी अडकला जाणार असून पाण्याचा निचरा वेगाने होण्यास मदत होणार आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे.
पावसाच्या पाण्याचा वेगाने निचरा होण्यासाठी पालिकेने पंपिंग स्टेशन बांधली आहेत. विशेषतः 2005 च्या अतिवृष्टीनंतर पालिकेने ब्रिमस्टोकॅडअंतर्गत आठ पंपिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर गेल्या 13 कर्षांत पालिकेने आतापर्यंत इर्ला, हाजी अली, करळी येथे क्लिक्हलॅण्ड आणि लक्हग्रोक्ह, रे रोडला ब्रिटानिया आऊटफॉल ही पाच पंपिंग स्टेशन सुरू केली, मात्र पंपिंग स्टेशन उभारूनदेखील अनेक भागात अतिवृष्टीत पाणी साठल्याने नागरिकांची गैरसोय होण्याचे प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर या स्थितीचा अभ्यास केल्यानंतर प्लॅस्टिकचा कचरा, थर्माकोल, पाण्याची बाटल्या असा अनेक प्रकारचा कचरा जलवाहिन्यांमध्ये अडकून पंपिंग स्टेशनमधून पाण्याचा निचरा होण्यास अडथळा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर पावसाच्या पाण्याचा निचरा वेगाने होण्यासाठी ‘बॅक रेक स्क्रीन’ बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
असे होणार काम
- इर्ला नाल्याकर ही स्क्रीन बसकिण्याचे कार्यादेश देण्यात आले आहेत. तर लक्हग्रोक्हसाठी निकिदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात 60 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- गझदरबंद पंपिंग स्टेशनचे काम मे 2019 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर मोगरा पंपिंग स्टेशनसाठी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


























































