
सामना प्रतिनिधी । नळेगाव
काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ नळेगाव येथे सर्व राजकिय पक्ष व सामाजिक संघटना, व्यापाऱ्यांनी दुकाने कडकडीत बंद करून निषेध केला व हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पुलवामामध्ये काल झालेल्या सीआरपीएफच्या जवानांवर आत्मघातकी हल्ल्यामुळे नागरिकांत संतापाची भावना निर्माण झाली आहे. या भ्याड हल्ल्याचा शनिवारी संभाजी चौक ते शिवाजी चौकापर्यंत निषेध रॅली काढत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत शिवसेनेसह विविध संघटनांच्या वतीने पाकच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला.
यावेळी रवी शिरूरे, दत्ता बिराजदार, घृष्णेश्वर मलशेट्टे, शंकर शेलार, वैभव पाटील, दत्ता राजमाने, अनिल चव्हाण, राजू शेलार, राहुल घोने, दगडू सावळकर, बापू दांडे, मुन्ना धाविले, शेख वसीम, दगडू राजमाने, सागर भांडवले, संकेत शेलार, महेश बिराजदार, माजी सैनिक संघटना, व्यापारी वर्ग, गावातील नागरिक उपस्थित होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस गोविंद राठोड, गणेश बुजारे हजर होते.



























































