बीएसएनएल कर्मचार्‍यांची निदर्शने; देशव्यापी संपाला नगरमधून प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बीएसएनएलचे नुकसान होत असल्याचा आरोप करीत विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया युनियन्स अ‍ॅण्ड असोसिशन ऑफ बीएसएनएलच्यावतीने पुकारण्यात आलेल्या तीन दिवसीय संपाला पाठिंबा देत नगरमधील अधिकारी व कर्मचार्‍यांनी सोमवारी बीएसएनएल कार्यालयासमोर निदर्शने करुन संप पुकारला. जिल्ह्यातील सुमारे एक हजारापेक्षा जास्त कर्मचारी या संपात उतरले आहेत.

जिल्ह्यातील या संपाचे नेतृत्व बीएसएनएल ईयू संघटनेचे कॉ. अप्पासाहेब गागरे, विठ्ठल औटी, लालाजी शेख, विजय शिपणकर, रमेश शिंदे, एनएफटीइचे बजरंग घटे, त्रिंबक दुधाडे, स्नेहाचे कॉ.विजय पिंपरकर, एस.के. घुगे, बीएसएनएल ईएचे शिवाजी तांबे, रवींद्र शिंदे आदी करत आहे. बीएसएनएलला फोरजी स्पेक्ट्रम द्या, 15 टक्के वाढीसह वेतनाची पुनर्रचना अंमलात आणा, बीएसएनएलच्या टॉवर्सचे आऊट सोर्सिंग बंद करा, बीएसएनएलच्या जमिनीचे व्यवस्थापन धोरण ठरवा, बीएसएनएलला बँकाकडून कर्ज घेण्यासाठी लेटर ऑफ कम्फर्ट द्या, सर्व मालमत्ता बीएसएनएलच्या नावावर करा आदी मागण्यांसाठी हा तीन दिवसीय संप पुकारण्यात आला आहे.