हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही! इम्रान खान यांची धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
क्रिकेटपटू इम्रान खान लवकरच पाकिस्तानचे पंतप्रधान होणार आहेत. इम्रान खान हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीपेक्षा त्यांच्या लव्ह अफेयर्समुळेच जास्त चर्चेत राहिले

सामना ऑनलाईन, इस्लामाबाद

पुलवामा हल्ल्याचे काही पुरावे असतील तर हिंदुस्थानने द्यावेत, त्यात तथ्य आढळले तर आम्ही कारवाई करू, पण पाकिस्तानवर हल्ला करण्याचा विचार केला तर आम्ही गप्प बसणार नाही, अशी धमकी आज मंगळवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान यांनी दिली.

पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानच्या पलटवाराच्या धास्तीने पाकिस्तानला थरथरी सुटली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान यांनी आज पुरावे द्या, कारवाई करतो, अशी नौटंकी केली. आम्ही स्थैर्याकडे वाटचाल करत आहोत, त्यामुळे आम्ही असे का करू, असा प्रश्न त्यांनी विचारला. दहशतवादावर बोलण्यास आमची तयारी आहे. पण पाकिस्तानवर हल्ला करण्याचा विचार करत असाल तर आम्ही मागे हटणार नाही, असेही इम्रानखान म्हणाले. चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सुटेल, संवाद सुरू झाला पाहिजे, अशी फेकाफेकीही त्यांनी केली. पुलवामा हल्ल्यात काही पुरावे सापडले असतील तर हिंदुस्थानने ते आम्हाला द्यावेत, आम्ही नक्की त्यावर कारवाई करू, अशी मखलाशीही त्यांनी केली.