मेहकर बसस्थानक पुर्नबांधणी करीता 3 कोटी 9 लक्ष रुपये मंजूर 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मेहकर 

मेहकर बसस्थानक पुर्नबांधणी साठी आमदार संजय रायमूलकर यांचे प्रयत्नाने ३ कोटी ९ लाख रुपयांच्या कामांना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.

मेहकर येथील बसस्थानक हे राष्ट्रीय महामार्गावर असून येथे दिवस रात्र वाहतूक सुरू असते. येथील बसस्थानकावर प्रवाशाना चांगली सुविधा मिळावी यासाठी आमदार संजय रायमूलकर यांनी शासनाकडे वारंवार मागणी केली होती. याची दखल घेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सदर बसस्थानकाचे  कामासाठी वास्तूविशारद यांची नियुक्ती करून अंदाजपत्रक मागविले होते. त्यानुसार या अंदाजपत्रकात बसस्थानक इमारतीच्या बांधकाम करणे यासाठी २ कोटी ३५ लक्ष रुपये व विद्युत व्यवस्था २० लक्ष रुपये खर्च करण्यात येणार असून इतर कामासाठी उर्वरीत रक्कम खर्च होणार आहे. सदर कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे.