डोंबिवलीत बनावट नोटांचा गोरखधंदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। कल्याण

संगणक आणि प्रिंटरच्या सहाय्याने दोन हजारांच्या बनावट नोटा छापणाऱया दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

डोंबिवलीत गजबजलेल्या ठिकाणी हा गोरखधंदा सुरू होता. भूषण साळुंखे आणि सुकेश बांगेरा अशी आरोपींची नावे आहेत. नवी मुंबईतील भूषण साळुंखे हा गोरखधंद्याचा मास्टरमाइंड आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी यू टय़ूबवर नोटा कशा तयार होतात याचा व्हिडीओ पाहिला होता. त्याचा आधार घेऊन संगणक आणि एका प्रिंटरच्या सहाय्याने त्याने 2 हजारांच्या नकली नोटा तयार करण्याचे काम सुरू केले. मात्र एका व्यवहारातून त्याची ही बनवाबनवी उघडकीस आली आणि तो पोलिसांना सापडला. साळुंखे याने किती बनावट नोटा चलनात आणल्या याचा पोलीस तपास करत आहेत.