झाराप पत्रादेवी महामार्गाच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। सिंधुदुर्गनगरी

राष्ट्रीय महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी या रस्त्याचे डागडुजीचे सन २०१७-१८ मध्ये झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तसेच यावर पुर्नडांबरीकरण करण्यात आले तेही उखडले आहे. त्यामुळे संबधित ठेकेदार निकृष्ट काम करीत असून त्याला ज्युनिअर इंजिनिअर पाठीशी घालत आहेत असा आरोप करत संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच सावंतवाडी नेमळे येथील ग्रामस्थ प्रदीप मुळीक यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.

झाराप ते पत्रादेवी या राष्ट्रीय मार्गाच्या डागडुजीसाठी सन 2017-18 मध्ये सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले होते. त्याने रस्त्याचे काम पूर्णतः नित्कृष्ट दर्जाचे केले असल्याचा आरोपही या ग्रामस्थांनी केला आहे. हा निकृष्ट दर्जाचा रस्ता अपघातास कारणीभूत ठरत आहे. त्याला संबंधित ठेकेदार व जुनिअर इंजिनीअर जबाबदार आहेत. तसेच निकृष्ट महामार्गावर खड्डे पडल्याने त्यावर पुर्नडांबरीकरण करण्यात यावे आणि नित्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे यासाठी 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा ईशारा या ग्रामस्थांनी दिला होता.

दरम्यान 22 जानेवारी रोजी सदर महामार्गाच्या दुरुस्तीचे काम आठवड्याभरात सुरु केले जाईल असे लेखी पत्र उपविभागीय अभियंत्ता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग सावंतवाडी यांना दिले. त्यानंतर 26 जानेवारी रोजीच उपोषण स्थगित करण्यात आले होते. त्यानुसार दुरुस्तीचे काम फेब्रुवारी च्या सुरुवातीला करण्यात आले मात्र पुर्नडांबरीकरण न करता खड्डे बुजविण्यात आले. परंतू तेही काही दिवसात उखडले आहे.

झाराप ते पत्रादेवी या राष्ट्रिय महामार्गाच्या डागडुजीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. मात्र ठेकेदार व इंजिनीअर ला महामार्ग सुस्थितित असल्याचे वाटत असल्यास संबंधितांनी या महामार्गवरून ७० च्या स्पीड ने वाहन चालवून दाखवावे असे आव्हानही सम्बंधित ठेकेदार व इंजिनीअर या ग्रामस्थांना दिले आहे.