कर्जबाजारी शेतकऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। निलंगा

निलंगा तालुक्यातील गुऱ्हाळ येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून भिकाजी बाबुराव जाधव (४४) या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. कर्जाचा वाढणारा डोंगर आणि दुष्काळी परिस्थिती यामुळे भिकाजी यांना कर्ज फेडणे शकय झाले नाही. यामुळे मंगळवारी तहसील कार्यालयात दुपारी १ च्या सुमारास भिकाजी याने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

ही घटना घडताच तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जाधव यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले . निलंगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.