IRCTC घडवणार क्रूझ सफर, सहा देशांची होणार भ्रमंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

IRCTC आता प्रवाशांना सागरी सफर घडवणार आहे. 24 जून ही क्रूझ सेवा सुरू होणार असून नॉर्वेजियन गेटवेपासून तिची सफर सुरू होईल. डेन्मार्क, जर्मनी, पोलंड, फिनलंड रशिया आणि स्वीडन या देशांची ही क्रूझ सफर करवणार आहे.

या क्रूझसाठीच्या तिकीटाची रक्कम प्रति माणशी 3 लाख 16 हजारांपासून पुढे अशी असेल. सर्वात महागडे तिकीट हे 6 लाख 14 हजारांचे असणार आहे. या क्रूझबोटीवर तुम्हाला बाल्कनी केबिन, सूट किंवा मिनी सूट असे पर्याय निवडता येणार आहेत. या पॅकेजमध्ये जेवण, स्विमिंग ,प्रवासी विमा, विसा शुल्क, हॉटेलचे भाडे तसेच परतीच्या प्रवासाच्या शुल्काचाही समावेश आहे. प्रवासामध्ये नॉर्वेतील खाद्यप्रकारांचा आनंद लुटता येईल अशी माहिती IRCTCचे जनसंपर्क अधिकारी पिनाकीन मोरवाला यांनी दिली आहे.