
सामना ऑनलाईन । अलिबाग
हिंदुस्थानातील पंजाब नॅशनल बँक घोटळ्यातील फरार आरोपी नीरव मोदी याचा अलिबाग किहीम येथील बंगला शुक्रवारी स्फोटकांच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न झाला. मात्र या बंगल्याचे काम इतके मजबूत आहे की संपूर्ण बंगला मशीनच्या सहाय्याने पाडण्यासाठी आणखी 15 ते 20 दिवस लागणार आहेत.
#WATCH Maharashtra: PNB Scam accused Nirav Modi’s bungalow in Alibag, Raigad district demolished by authorities. pic.twitter.com/ngrJstNjoa
— ANI (@ANI) March 8, 2019
सुरूंग लावून हा बंगला पाडण्यासाठी मागील तीन चार दिवसांपासून तयारी सुरू होती. शुक्रवारी सकाळी नीरव मोदीचा बंगला तोडण्यासाठी सुरुंग लावण्यात आले. यामध्ये तीस किलो स्फोटके वापरण्यात आली. बंगालाच्या खांबांमध्ये स्फोटके भरून बंगला पाडण्याची तयारी पूर्ण करण्यात आली. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर हा बंगला पाडण्याचा कारवाईच्या दृष्टीने परिसरातील दोनशे मीटर पर्यंतचा परिसर रिकामा करण्यात आला. तसेच वाहनांना बंदी करण्यात आली होती. बंगला पाडण्याची प्रक्रिया पाहण्यासाठी आणि त्याचे वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या प्रतिनिधींनाही दूर उभे राहण्यास प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाने अधिकारी, पोलीस, महसूल, बांधकाम अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. स्फोट झाल्यावर संपूर्ण बंगला पत्त्यांसारखा कोसळेल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. बंगल्याचा काही भाग पडला आणि खचला. आता उर्वरित बंगला मशीनच्या सहाय्याने तोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Maharashtra: Authorities continue demolition of PNB scam accused Nirav Modi’s bungalow in Alibag, Raigad district. pic.twitter.com/Tyu5Anz1VQ
— ANI (@ANI) March 8, 2019
उच्चन्यायालयाने दिलेल्या निर्देशांनतर फरार हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्या किहीम येथील समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या बंगला पाडण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र बांधकाम पक्के असल्याने मशीनच्या सहाय्याने हे काम करताना बराच वेळ लागत होता. अखेर सुरूंगाच्या सहाय्याने हा बंगला पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.



























































