राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केलेले नगरमधून विखेंविरोधात संग्राम जगताप यांचा अर्ज दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

नगर लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी संग्राम अरुणकाका जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नामनिर्देशनपत्र दाखल केले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला. मंगळवारी एकूण 12 जणांनी 19 अर्ज नेल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली.

एकही गुन्हा दाखल नसलेल्या सुजय विखेंची संपत्ती कोटींच्या घरात

संग्राम जगताप यांनी पारनेर तालुक्यातील जवळा येथील शेतकरी श्बबनराव रासकर आणि त्यांच्या पत्नी अंजनाबाई रासकर यांच्या हस्ते नामनिर्देशनपत्र दाखल केले. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिनेत्री दिपाली सय्यद यांची निवडणुकीतून माघार, सुजय विखेंना पाठींबा जाहीर

नगर दक्षिण मतदारसंघाच्या जागेवरून राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये मतभेद झाले होते. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ही जागा मागितली होती. परंतु शरद पवार यांनी भूतकाळातील दाखले देत आम्ही येथील जागा जिंकून दाखवू असे म्हणत विखेंची मागणी फेटाळली होती. यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय यांनी भाजपशी गाठ बांधली आणि उमेदवारी मिळवली. शरद पवार आणि विखेंनी या मतदारसंघामध्ये आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असल्याने येथील निवडणूक चुरशीची झाली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यामध्येच मुख्य सामना रंगणार आहे.

महायुतीच्या महारॅलीने मोठे शक्तीप्रदर्शन, डॉ. सुजय विखे यांचा अर्ज दाखल