22 रबरी टय़ूबमध्ये हातभट्टीच्या दारूचा स्टॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । उल्हासनगर

लोकसभा निवडणुकीत देशी–विदेशी दारूविक्रीने जोर पकडला असतानाच गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी हातभट्टी दारूसाठय़ाच्या तब्बल 22 रबरी टय़ूब जप्त केल्या आहेत. विठ्ठलवाडीमधील माणेरे गावात घराबाहेर दारूसाठा ठेवणाऱया आरोपी नितीन फुलोरेला पोलिसांनी अटक केली आहे. उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा झेंडे, उपनिरीक्षक गणेश तोरगल, गिरीश गायकवाड, संतोष धाडवे या पथकाने ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या 22 टय़ूबमध्ये 880 लिटर हातभट्टी दारू असून त्याची किंमत 66 हजार रुपये आहे.