
सामना ऑनलाई । इटानगर
नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) हा राजकीय पक्ष अरुणाचल प्रदेशात प्रथमच लोकसभा निवडणूक लढवणार आहे. या पक्षाने भाजपला आपला पूर्ण पाठिंबा शुक्रवारी जाहीर केल्याची माहिती एनपीपीचे अध्यक्ष गिचो काबाक यांनी दिली. अरुणाचलमधील लोकसभेच्या दोन जागांपैकी एक जागा आणि विधानसभेच्या 27 जागा एनपीपी लढवणार आहे. येत्या 11 एप्रिल रोजी अरुणाचलमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या अशा दोन्ही निवडणुका एकाच वेळी होत आहेत.


























































