आगीत दोन दुकाने जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । निलंगा

शहरातील पांचाळ कॉलनी भागात शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या भीषण आगीत एका जनरल स्टोरचे जवळपास पंधरा लाखाचे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी नगरपालिकेचे अग्निशामक दल व शेजाऱ्यांनी मदत केल्याने आग आटोक्यात आली. पण तोपर्यंत मधील सर्व साहित्य जळून खाक झाले होते.

भगवान जाधव रा. गुराळ यांचे पांचाळ कॉलनी भागात भाग्यश्री जनरल स्टोअर नावाने स्टेशनरी दुकान आहे. आज सकाळी साडेआठच्या दरम्यान बाजूच्या दुकानदाराला जनरल स्टोअर मधून धूर निघत असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्याने नगरपालिकेला दूरध्वनीद्वारे संपर्क केला. त्यादरम्यान इतरांची मदत घेऊन त्याने पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला. यावेळी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, या भागातील नगरसेवक, डॉक्टर, आजूबाजूचे शेजारी पाजारी, विद्यार्थ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. दुकानातील जवळपास पंधरा लाखाचे साहित्य व रोख 90 हजार रुपये नगदी जळण्याने मोठेच नुकसान झाल्याचे भगवान जाधव यांनी सांगितले. जनरल स्टोअरच्या बाजूचे बांगड्याचेही दुकान आगीत जळून खाक झाले आहे. . पोलीस पुढील तपास करीत आहेत.