
सामना प्रतिनिधी । परभणी
परभणी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना -भाजप-रासप महायुतीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ वारकरी सांप्रदायही सरसावला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या वारकरी सांप्रदायाकडून यापूर्वीच खासदार संजय जाधव यांना पाठींबा देण्यात आला आहे. संजय जाधव हे स्वत: माळकरी असून वारकरी सांप्रदायाचे कट्टर पुरसकर्ते आहेत.
परभणी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ परभणी आणि पूर्णा या तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या संवादातून वारकरी सांप्रादायात कार्य करत असलेल्या मतदारांनी खासदार संजय जाधव यांच्यासाठी आपण स्वत: प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगीतले. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मादी यांना पुन्हा विराजमान करणे गरजेचे आहे. त्यामुळे परभणी शिवसेना-भाजपा, रिपाई महायुतीचे उमेदवार संजय जाधव यांच्यासोबत असलेल्या नाराजीला पूर्णविराम देत प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार यावेळी वारकरी सांप्रादायातील मंडळींनी बोलून दाखविला. खासदार जाधव यांनी गेल्या पंधरा वर्षात सातत्याने कामे करुन वारकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. या याबद्दल उपस्थितांनी लोकशाहीचे संरक्षण करणारे सरकार निवडून आणण्यावर भर दिला. महायुतीचे उमेदवार खासदार जाधव यांनाच प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले. परभणी आणि पूर्णा तालक्यातील अनेक ग्रामण भागात खासदार संजय जाधव यांनी भेटी दिल्या. यावेळी सरपंच तंटामुक्तीचे अध्यक्ष व ग्रामपंचायतीचे सदस्यांनी महायुतीच्या उमेदवारास जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
पूर्णा : परभणी लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ 10 एप्रिल रोजी ताडकळस परिसरात शिवसेनेच्या वतीने भव्य रॅली काढली. यामध्ये हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते. सकाळी दहा वाजता ताडकळस येथे शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली शहरातून झंझावत प्रचाराची भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये सगळे भगवेमय वातावरण झाले होते. यावेळी शिवसेना, भाजपा, रासप, आठवले गटाच्या कार्यकत्र्यांनी उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.

























































