दोन पंतप्रधान सरदार पटेल यांनाही मंजूर नव्हते, मोदींची विरोधकांवर आगपाखड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कश्मीरमध्ये एक नेता देशात दोन पंतप्रधान असावे असे बोलतो, हे तुम्हाला मंजूर आहे का? नाही ना. सरदार पटेल यांनाही हे मंजूर नव्हते. आज जम्मू-कश्मीरमध्ये रोज जवान शहीद होत आहेत आणि नेते कश्मीरसाठी वेगळ्या पंतप्रधानाची भाषा करत आहेत, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि सहयोगी पक्ष नॅशनल कॉन्फरन्सवर आसूड ओढळे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातामध्ये तापी जिल्ह्यातील सोनगढ येथे सभा घेतली. या सभेत त्यांनी विरोधकांची पिसे काढली.

भाषणाच्या सुरुवातीला मोदींनी सरदार पटेल यांची आठवण काढली. दक्षिण गुजरातमध्ये आल्यानंतर सरदार साहेबांची आठवण येते. सरदार पटेल यांनी दाखवलेल्या रस्त्याने देश गेला असता तर आज कुठल्या कुठे पोहोचला असता. परंतु दुर्भाग्याची गोष्ट ही की सरदार पटेलांनी दाखवलेला रस्ता काँग्रेसने सोडला.

सरदार पटेल यांच्यामुळे जूनागढचे गुजरातमध्ये विलिनिकरण झाले. परंतु जम्मू-कश्मीरचा विषय पंडित नेहरू यांनी स्वत:कडेच ठेवला आणि देश याचे परिणाम भोगत आहेत, अशी टीका मोदींनी यावेळी केली. यावेळी मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याला ढकोसलापत्र म्हणत सरदार पटेल आज असते तर त्यांनी याचा कधीही स्वीकार केला नसते असेही ते म्हणाले. तसेच काँग्रेस मोदी हटवण्याच्या बाता करत आहे, तर मोदी गरिबी हटवण्यासाठी प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.