
सामना ऑनलाईन । बंगळुरू
मतदान करताना सेल्फी किंवा व्हिडीओ काढला जाऊ नये म्हणून कर्नाटक सरकारने पोलिंग बूथमध्ये स्मार्टफोनवर बंदी घातली आहे. मतदान करायला जाण्याआधी त्यांना फोन मतदान केंद्रांवरील पोलिसांकडे जमा करावे लागणार आहेत.
मतदारांना त्यांचे स्मार्टफोन घरी ठेवून येण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. ‘ आचारसंहितेतील नियमांनुसार पोलीस बूथपासून 100 मीटरच्या अंतरापर्यंत स्मार्टफोन तसेच कॅमेरे नेण्यास बंदी असते. त्यामुळे मतदारांनी फोन घरी ठेवावे किेंवा केंद्रांवरील पोलिसांकडे जमा करावे, असे कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार यांनी सांगितले.



























































