बांगलादेशच्या वर्ल्ड कप संघात नका भिडू; अबू जायेदला संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ढाका

बांगलादेश क्रिकेट संघाने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी मंगळवारी आपला 15 सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला. मश्रफे मोर्ताझाच्या नेतृत्वाखालील या संघात एकही एकदिवसीय सामना न खेळलेल्या अबू जायेद या युवा गोलंदाजाला नवा भिडू म्हणून स्थान दिले आहे. न्यूझीलंडकिरुद्धच्या कसोटी मालिकेत जायेदने आपल्या स्विंग गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले होते.

बांगलादेश – मश्रफे मोर्ताझा (कर्णधार), शाकिब अल हसन (उपकर्णधार), तमीम इक्बाल, महमदुल्लाह, मुश्फीकर रहीम, सौम्या सरकार, लिटन दास, सब्बीर रहमान, मेहिदी हसन, मोहम्मद मिथुन, रुबेल हुसेन, मुस्ताफिजूर रहमान, मोहम्मद सैफुद्दीन, मोसाद्देक हुसेन, अबू जायेद.