दारूबंदी असलेल्या चंद्रपुरात रिकाम्या बाटल्यांचा सडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
liquor Liqueur
फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन । चंद्रपूर

दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिह्यात वारंवार दारू तस्करी आणि विक्रीची प्रकरणे घडली आहेत. त्याचप्रमाणे ही बंदी फोल ठरल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भरउन्हात धावपळ केल्यामुळे त्यांचा घसा कोरडा पडला होता. घसा ओला करण्यासाठी पक्ष्यांच्या नेत्यांनी दारूबंदी असलेल्या चंद्रपूरमध्ये मुबलक दारू कार्यकर्त्यांना पाजल्याचे चित्र उघडकीस आले आहेत. दुर्गापूरच्या मार्गावर चक्क दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा सडा पडल्याचे दृश पाहायला मिळाले आहे. यात देशीविदेशी, ताडी, मोहाच्या दारूच्या बॉटल्स रस्त्यावर पडलेल्या दिसून आल्या. दारूबंदी असताना एवढी मुबलक दारू चंद्रपूरमध्ये आली कशी, असा सवाल चंद्रपूरकर करीत आहे.