
सामना ऑनलाईन । श्रीनगर
अनंतनाग जिल्हय़ात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी ठार झाले. यातील एक दहशतवादी फिजिओथेरपीच्या पदवीचे शिक्षण घेत होता. अनंतनागमध्ये शोधमोहिमेदरम्यान ही चकमक उडाली. सफदर अमिन भट (25) हा दहशतवादी बिजबेहरा परिसरातील जिरपोरा गावातील आहे तर बुऱहाण अहमद गनाई ऊर्फ सैफुल्लाहा (25) हा फिजिओथेरपीचे शिक्षण घेत होता. बुऱहाण जून 2018मध्ये दहशतवादी गटात सामील झाला होता.























































