
सामना प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यात आतापर्यंतच्या तापमानात उच्चांक नोंद झाली आज तापमानाने 43 डिग्री सेल्सिएस ओलांडली आहे. या पूर्वी 42.8 हे सर्वोच्च तापमान नोंदवले गेले. बीड जिल्हा चांगलाच तापला सकाळी नऊ पासूनच उन्हाची तीव्रता वाढत आहे, प्रचंड तापमान वाढत असल्याने दुपारी बीड शहरासह बहुतांश रस्त्यावर शुकशुकाट निर्माण होत आहे. गरम हवा वाढत असल्याने रुग्णाची संख्या वाढत आहे. आजपर्यंत 42.8 हा तापमानाचा आकडा आज च्या तापमानाने ओलांडला आहे.आज बीड चे तापमान 43 डिग्रीवर पोहोचले.

























































