बीड-पुणे ट्रॅव्हल्सची बस जळून खाक; प्रवासी सुखरूप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पाटोदा

बीड ते पुणे वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या बसने शनिवारी रात्री 1 वाजता पिंपळवंडीत अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत ट्रॅव्हल्सची बस जळून खाक झाली आहे. चालकाच्या सर्तकतेमुळे सर्व प्रवासी बचावले आहेत. पाटोदा तालुक्यातील अमळनेर जवळील पिंपळवंडी येथे बीडमधील सागर ट्रॅव्हल्सची बीड ते पुणे या बसने अचानक रात्री 1 वाजता पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली आणि सर्व प्रवाशांना उतरवले. त्यामुळे सर्व प्रवासी सुखरुप बचावले आहेत. घटनेची माहिती मिळताच अमळनेरच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांची मदत केली.