लॉच्या परीक्षेत लोचा; निकालापूर्वीच घेतली फेरपरीक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
law-college-students

सामना ऑनलाईन । मुंबई

तिसऱया आणि पाचव्या वर्षाच्या लॉ अभ्यासक्रमाच्या प्रॅक्टिकल परीक्षेत बहुसंख्य विद्यार्थी नापास झाले आहेत. या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याच्या मार्गावर आहे. कारण कॉलेजने परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच फेरपरीक्षाही घेतली आहे. मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्याआधीच फेरपरीक्षा घेणाऱया शासकीय विधी महाविद्यालयावर कारवाई करण्याची मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलने केली आहे.

27 एप्रिलला लॉच्या मुख्य प्रॅक्टिकल परीक्षेचा तसेच फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाला. मुख्य परीक्षेत अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत. या नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याच्या मार्गावर आहे. कॉलेजने मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच फेरपरीक्षा घेतली. जे विद्यार्थी मुख्य परीक्षेला गैरहजर होते त्यांनी फेरपरीक्षा दिली. मात्र आता मुख्य परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेण्यास कॉलेजने नकार दिला आहे. मुख्य परीक्षेत नापास झालेल्या काही विद्यार्थ्यांनी पुन्हा फेरपरीक्षा घेण्याची मागणी कॉलेजकडे केली. मात्र विद्यार्थ्यांची ही मागणी फेटाळून लावण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबई विद्यापीठाने या कॉलेजवर कारवाई करण्याची मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलने केली आहे.

बीएमएस सत्र 6ची परीक्षा आजपासून

मुंबई विद्यापीठाच्या 2019च्या उन्हाळी सत्राची तृतीय वर्ष बीएमएस सत्र 6 ची परीक्षा 2 मे पासून सुरू होत असून ती 9 मे पर्यंत चालणार आहे. या परीक्षेस 15230 विद्यार्थीं परीक्षेस बसणार आहेत.  सात जिह्यांतील 157 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. ही परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परीक्षा विभाग सज्ज झाला आहे. बीएमएस परीक्षेला सर्वात जास्त म्हणजे 4792 विद्यार्थी मुंबई जिह्यातून बसत असून याच ठिकाणाहून सर्वाधिक म्हणजे 2816 मुले परीक्षेस बसत आहेत. 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून बीएमएस या अभ्यासक्रम चॉइस बेसनुसार करण्यात आलेला आहे. परीक्षेचा कालावधी अडीच तासांचा असून ही परीक्षा सकाळी 10.30 वाजता सुरू होऊन दुपारी 1.00 वाजता संपणार आहे.