
सामना ऑनलाईन। पुरुलिया
तृणमूल काँग्रेसवर खंडणीचे पैसे वापरल्याचा आरोप करणाऱया नरेंद्र मोदींना लोकशाहीची थप्पड मारावीशी वाटते असे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. मोदी आणि अमित शाह हे दुर्योधन आणि रावणासारखे आहेत अशी टिकाही त्यांनी केली आहे.
आमचा पक्ष खंडणीच्या पैशांवर चालत नाही तर माझ्या विकल्या जाणाऱया चित्रांच्या, पुस्तकांच्या आणि इतर कामांच्या उत्पन्नावर चालतो. आम्ही खंडणीखोर नाही पण, मोदी आमच्यावर खोटे आरोप करत आहेत. असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तृणमुल काँग्रेस हा खंडणीच्या पैशांवर चालतो असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्याला ममता यांनी मंगळवारी प्रत्युत्तर दिले. खंडणीराज आणून ममता बॅनर्जी सरकारने लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप भाजपातर्फे करण्यात आला होता. पश्चिम बंगालच्या पुरुलिया येथील प्रचारसभेत त्या बोलत होत्या.

























































