मुंबई पुणे महामार्गावर उद्या 9 मे रोजी मेगा ब्लॉक: 12 ते 2 दरम्यान वाहतूक राहणार बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या ९ मे रोजी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार असून यावेळी मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तासांकरिता पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. ओव्हरहेड पॅन्ट्री बसवण्याचे कामकाज करण्यात येणार असल्याचे कारणाने हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड (MSRDC) तर्फे हे काम करण्यात येणार आहे. याबाबत महामार्ग पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर प्रवास करणाऱ्या सर्व वाहन चालकांना आणि प्रवाशांना कळवण्यात येत आहे की, ९ मे रोजी दुपारी ते दोन वाजेपर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओव्हरहेड पॅन्ट्री बसवण्याचे कामकाज महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा महामंडळ लिमिटेड (MSRDC) तर्फे करण्यात येणार आहे.

सदर कालावधीत द्रुतगती मार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तासांकरिता पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यादरम्यान सर्व प्रकारची अवजड व माल वाहतूक करणारी वाहने द्रुतगती मार्गवरील किमी ८५/५०० या ठिकाणी थांबण्यात येणार आहेत. हलकी चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने ही द्रुतगती मार्गावरील किवळे ब्रिज येथून जुना मुंबई-पुणे महामार्ग (NH-4) ने मुंबईकडे वळवण्यात येणार आहे. पोलिसांनी ब्लॉकदरम्यान पुणेकडून मुंबईकडे प्रवास करणाच्या सर्व वाहनचालक आणि प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केलं आहे.