फायर एनओसी नसलेल्या ठाण्यातील 15 रुग्णालयांना सील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, ठाणे

अग्नीसुरक्षेचे नियम पायदळी तुडवणाऱ्या  ठाण्यातील 15 खासगी रुग्णालयांवर मुंबई उच्च न्यायालयाने कारवाईचा हातोडा मारला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर खडबडून जागे होत अग्निशमन दल व अन्य खात्यांच्या अधिकाऱ्यांनी फायर एनओसी न घेतलेल्या 15 खासगी रुग्णालयांना आज थेट सीलच ठोकले. त्यानंतर या रुग्णालयांमधील रुग्णांना अन्य हॉस्पिटल्समध्ये दाखल करण्यात आले असून कारवाईच्या या बुस्टर ’इंजेक्शन’मुळे खासगी रुग्णालय चालकांचे धाबे दणाणले आहे.