विदर्भात उष्णतेची लाट कायम; मुंबईत घामाच्या धारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नागपूर

गेल्या आठवडय़ापासून नागपूरसह विदर्भात सुरू असलेली उष्णतेची लाट 10 मेपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. वैशाखाच्या वणव्यात विदर्भ पेटून उठला आहे. आज सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी येथे 45.9 अंश सेल्सियस नोंदविण्यात आली आहे तर हवामान खात्याने ऑरेंज ऍलर्ट जारी केल्यामुळे नागरिकांना उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान मुंबईत घामाच्या धारा वाहत असून 33 डिग्रीसेल्सियस तापमानाची नोंद झाली. आज अकोला 43.4, अमरावती 43.6, बुलडाणा 39, ब्रह्मपुरी 45.9, चंद्रपूर 45.8, नागपूर 45, वर्धा 45, गोंदिया 43, वाशीम 43.4, यवतमाळ 43.5, गडचिरोली 44 अंश सेल्सियस नोंदविण्यात आली आहे.