वेंगसरकर अकादमीचा संघ विजयी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
vengsarkar cricket academy pune

सामना क्रीडा प्रतिनिधी । मुंबई

वेरोक वेंगसरकर क्रिकेट अकादमी (पुणे) आणि दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन (मुंबई) यांनी ऊर्जा लाइफ्स आणि माय क्राफ्ट इंटरनॅशनल फाऊंडेशन यांच्या वतीने सातारा येथील सी.एस.डी.एस. अकादमीच्या मैदानावर झालेल्या कॅप्टन शंकरराव देशमुख कप या 14 वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. राज पाटील (53) आणि नील वर्मा (30) यांची उपयुक्त फलंदाजी आणि चिराग मोडक (15/4) व धनय जोशी (21/2) यांच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन (मुंबई) संघाने सातारा येथील सी.एस.डी.एस. अकादमीच्या मैदानावर झालेल्या लढतीत विजय मिळवला.