हिंदुस्थानचा गाईडेड बॉम्ब तयार, पोखरणमध्ये चाचणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

डीआरडीओने आज शुक्रवारी 500 किलो वजनाच्या इनशिअली गाईडेड बॉम्बची यशस्वी चाचणी करून हिंदुस्थानच्या शत्रूला चांगलाच इशारा दिला. राजस्थानच्या जैसलमेर जिल्हय़ातील पोखरण रेंजवर ही चाचणी करण्यात आली. चाचणीदरम्यान या गाईडेड बॉम्बने 30 किलोमीटरवरील लक्ष्याचा अचूक वेध घेतला. दोनच महिन्यांपूर्वी डीआरडीओने उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र्ााची यशस्वी चाचणी केली होती.