
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
त्रिपुरामध्ये वादळी वार्यासह आलेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे 739 लोकांना पुर्नवसन केंद्रात हलवण्यात आले असून एक हजारहून अधिक घरांचे चांगलेच नुकसान झाले आहे. राज्याच्या आपत्कलानी विभागाने दिलेल्या माहितीनुसार 739 पैकी 358 लोक हे उनाकोटी जिल्ह्यात आहेत अर 381 लोक हे उत्तरी त्रिपुरा जिल्ह्याचे रहिवासी आहेत.
Tripura: 22 NDRF teams have been deployed in Dharmanagar following heavy rainfall that led to flash flood in the area. State Admn says,”We’re expecting to bring situation under control in next 24 hrs if it doesn’t rain anymore.There are more than 350 ppl in 8 relief camps.”(25.5) pic.twitter.com/jfHNlIZYo0
— ANI (@ANI) May 26, 2019
या नैसर्गिक आपत्तीत अजूनह कुठलीही जीवितहानी झालेली नाही. सर्वाधिक फटका उत्तर त्रिपुरा, उनाकोटी आनि धलाई जिल्ह्याला बसला आहे. उनाकोटी जिल्ह्यातील मनु नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. रविवारीसुद्धा मुसळधार आणि वादळी वार्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच इशान्येकडील राज्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज हवानाम विभागाने व्यक्त केला आहे.
NDRF team rescued 268 people from flood affected areas in Dharmanagar, Distt- North Tripura (Tripura).@NDRFHQ # pic.twitter.com/gO4yxHlYmP
— NDRF GUWAHATI (@1Ndrf) May 25, 2019

























































