
सामना ऑनलाईन । मुंबई
बारावी परीक्षेचा निकाल आज 28 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. ऑनलाईन निकालात विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण दिसतील व सदर माहितीची प्रिंटआऊट काढता येईल.
ऑनलाईन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सोय आहे. 29 मे ते 17 जूनपर्यंत गुणपडताळीसाठी तसेच 29 मे ते 17 जूनपर्यंत छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम छायाप्रत घेणे आवश्यक आहे, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.
– श्रेणी सुधार योजनेचा लाभ घेण्यासाठी जुलै-ऑगस्ट 2019, फेब्रुवारी-मार्च 2020 या दोन परीक्षांची संधी आहे.
– नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे.
– www.mahresult.nic.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
– www.mahahsscboard. maharashtra.gov.in आणि www.mahahsscboard.in या वेबसाईटवर ज्युनियर कॉलेजचा एकत्रित निकाल पाहता येईल.
येथे पहा निकाल
– www.mahresult.nic.in
– www.hscresult.mkcl.org
– www.maharashtra education.com
– www.maharashtra12. jagarnjosh.com
मोबाईलवर निकाल
बीएसएनएल मोबाईल युजर्स 57766 या क्रमांकावर MHHSC<space> <seat no> हा मेसेज पाठवून निकाल पाहू शकतात.



























































