नशीब..! एकाच चेंडूवर धोनी 3 वेळा आऊट होता होता वाचला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मॅनचेस्टर

क्रिकेटमध्ये खेळण्याच्या तंत्रासोबत नशीबही बलवत्तर असावे लागते असे बोलले जाते. याचाच प्रत्यय मॅनचेस्टरमध्ये टीम इंडिया आणि वेस्ट इंडीजविरुद्धच्या लढतीत पाहायला मिळाला. माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्र सिंग धोनी एकाच चेंडूवर तीन वेळा आऊट होता होता वाचला.

टीम इंडियाच्या डावातील 34 व्या षटकातील फिरकी गोलंदाज फॅबियन अॅलेन याच्या पहिल्या चेंडूवर धोनी क्रिजमधून बाहेर येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतो. परंतु चेंडू बॅटला न लागता यष्टीरक्षक शाई होपकडे जातो. धसमुसळेपणाने यष्टीचित करताना होप तीन वेळा चुकतो आणि धोनी बाद होता होता वाचतो.