अकरावी प्रवेशाचे टेन्शन, आरक्षित जागा रिकाम्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अकरावी प्रवेशात सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी (ईडब्ल्यूएस) यंदा प्रथमच ठेवण्यात आलेल्या आरक्षित जागांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. एसईबीसी प्रवर्गातील राज्यातील 34 हजार 251 जागांसाठी 4 हजार 557 तर ईडब्ल्यूएस प्रवर्गातील 28 हजार 636 जागांसाठी अवघ्या 2 हजार 600 विद्यार्थ्यांनीच अर्ज केले आहेत. त्यामुळे या प्रवर्गातील हजारो जागा पहिल्याच वर्षी रिकाम्या राहण्याची शक्यता आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गात मोडणाऱया विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची संधी शिक्षण विभागाने दिली असून पालकांच्या हमीपत्रावर या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश दिला जाणार आहे.

अकरावी ऑनलाईन प्रवेशात एसईबीसी प्रवर्गासाठी 12 टक्के तर ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी 10 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या प्रवर्गासाठी पात्र असूनही बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सर्वसाधारण प्रवर्गातून अकरावीचा अर्ज भरला आहे. अशा विद्यार्थ्यांना आरक्षित जागेचा फायदा घेता यावा यासाठी शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी विद्यार्थ्यांना प्रवर्ग बदलण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून प्रवर्ग बदलण्यासाठी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केंद्रे व शाळांमध्ये संपर्क साधावा, असे शेलार यांनी सभागृहात सांगितले.

सुधारित वेळापत्रक

4 जुलैपर्यंत       – आर्ट्स, कॉमर्स, सायन्ससाठी ऑनलाईन अर्ज                                  भरणे, कोटा प्रवेश

6 व 8 जुलै        –           त्रुटी व हरकतीवर आक्षेप नोंदविणे

12 जुलै, सायं. 6    –       पहिली गुणवत्ता यादी

13, 15, 16 जुलै    –       प्रवेश घेणे

16 जुलै            – पहिल्या यादीतील कटऑफ; दुसऱया                                 यादीसाठी रिक्त जागा जाहीर होणार

17, 18 जुलै      – दुसऱया यादीसाठी अर्ज भरणे, बदल करणे

22 जुलै            – दुसरी गुणवत्ता यादी

23 ते 25 जुलै    – प्रवेश घेणे

25 जुलै            – दुसऱया यादीतील कटऑफ; तिसऱया यादीसाठी                             रिक्त जागा जाहीर होणार

27, 29 जुलै      – तिसऱया यादीसाठी अर्ज भरणे, बदल करणे

1 ऑगस्ट          – तिसरी गुणवत्ता यादी

2, 3, 5 ऑगस्ट – प्रवेश घेणे

5 ऑगस्ट          – तिसऱया यादीतील कटऑफ; विशेष गुणवत्ता                                  फेरीसाठी रिक्त जागा जाहीर होणार

6, 7 ऑगस्ट      – विशेष यादीसाठी अर्ज भरणे, बदल करणे

9 ऑगस्ट          – विशेष गुणवत्ता यादी

10, 13 ऑगस्ट – प्रवेश घेणे

14 ऑगस्ट        – रिक्त जागा जाहीर

 

timetable 

पालकांनो, साध्या कागदावर हमीपत्र द्या!

एसईबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज करणाऱया विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र तसेच उत्पन्नाचा दाखला नसल्यास पालकांनी साध्या कागदावर हमीपत्र द्यायचे आहे. जात प्रमाणपत्र आणि वर्ष 2018-19चा उत्पन्नाचा दाखल सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली असून सध्या हमीपत्राच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. हमीपत्राचा नमुना अकरावी प्रवेशाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

प्रवेश प्रक्रिया 11 दिवस लांबली

अकरावी प्रवेशाचा खोळंबा यंदाही झाला असून सुधारित वेळापत्रकामुळे आधी 3 ऑगस्टला संपणारी प्रवेश प्रक्रिया आता 11 दिवस पुढे गेली आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार पहिली गुणवत्ता यादी 6 जुलैला जाहीर होणार होती.   मात्र गुरुवारी न्यायालयाने  एसईबीसी (मराठा) आरक्षणावर शिक्कामोर्तब केल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने प्रवेशाचे वेळापत्रक नव्याने जाहीर केले असून आता पहिली यादी 12 जुलैला जाहीर होईल. ही प्रक्रिया संपल्यानंतर प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य फेरीचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.

आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण अकरावी प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. सहा किषय घेऊन परीक्षेस प्रकिष्ट होणाऱया किद्यार्थ्यांसाठी हे आदेश देण्यात आले होते. सहा किषय घेतलेल्या किद्यार्थ्यांचे ग्रुप 1 क ग्रुप 2 मधील पाच किषयांचे गुणच प्रकेशासाठी ग्राह्य धरले जातील. ग्रुप 1, 2 मधील सहा किषयांपैकी कोणतेही पाच किषयांचे बेस्ट फाइक्ह गुण ग्राह्य धरण्यात येतील. किंका (ब) ग्रुप 1, 2 क ग्रुप 3 मधील सात किषयांपैकी 700 गुणांची सरासरी ग्राह्य धरण्यात येणार आहेत.